रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या मृत्यूची नोंद नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १३ ऑक्टोबर) करोनामुळे मृत्यू झालेल्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.

जिल्ह्यात आज नवे ४५ रुग्ण आढळले, तर १४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७१ आहे.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ४५ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ५४९ झाली असून, आतापर्यंत ७५ हजार ७३२ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.४१ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५४० पैकी ५१९ अहवाल निगेटिव्ह, तर २१ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १२०९ नमुन्यांपैकी ११८५ अहवाल निगेटिव्ह, तर २४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ८२ हजार ९०३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ३७१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले २४२, तर लक्षणे असलेले १२९ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २३६ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात १३५ जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७, डीसीएचसीमधील ५८, तर डीसीएचमध्ये ७१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६२ जण ऑक्सिजनवर, २७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१२ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४४६ एवढीच आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२२, गुहागर १७१, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१५, रत्नागिरी ८१५, लांजा १२८, राजापूर १६२. (एकूण २४४६).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply