रत्नागिरी : रत्नागिरीत शिक्षण घेतलेल्या नितीन पळसुले देसाई यांची महावितरण कंपनीच्या रत्नागिरी मंडळात कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती झाली आहे.
रत्नागिरीच्या फिनोलेक्स अॅकॅडमीतील विद्युत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री. पळसुले देसाई यांची निवड महावितरण कंपनीत सहाय्यक अभियंता पदावर झाली. यानंतर त्यांनी विभागीय परीक्षा दिली. त्यामुळे त्यांची अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर निवड झाली. या पदावर त्यांनी मुंबईत महावितरण कंपनीच्या प्रकाशगड या मुख्यालयात काम केले. आता त्यांची पदोन्नतीने रत्नागिरीत कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्ती झाली आहे.
रत्नागिरीतील पहिले कार्यकारी अभियंता म्हणून श्री. पळसुले देसाई यांची नोंद होणार असून स्थानिक व्यक्ती प्रथमच एका महत्त्वाच्या पदावर रुजू झाल्यामुळे आता स्थानिक योजना आणि विकासाला प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरीतून अधिक शिक्षणासाठी पुणे, मुंबई येथे मुलांना पाठविणाऱ्या रत्नागिरीतील पालकांसाठी नितीन पळसुले देसाई हे उत्तम उदाहरण ठरावे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media