Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ६३ सक्रिय रुग्ण

coronavirus

Photo by CDC on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ३ रुग्ण आढळले. त्याच्या दुपटीहून अधिक म्हणजे ७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या केवळ ६३ सक्रिय रुग्ण आहेत.

आज आढळलेल्या नव्या करोनाबाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली १, कुडाळ १, मालवण ०, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ६३ रुग्णांपैकी १० रुग्ण ऑक्सिजनवर, तर ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग २, कणकवली २०, कुडाळ ९, मालवण ७, सावंतवाडी ११, वैभववाडी ३, वेंगुर्ले ४, जिल्ह्याबाहेरील १.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५७ एवढी आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९८, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version