सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत ७६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे १२ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय म्हणजेच उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या ३३३ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज जिल्ह्याबाहेरील एका तपासणीसह नवे १२ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ९४९ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग १, कणकवली १, कुडाळ ४, मालवण ०, सावंतवाडी २, वैभववाडी ०, वेंगुर्ले १, जिल्ह्याबाहेरील ०.
जिल्ह्यात सध्या ३३३ सक्रिय रुग्ण असून, सक्रिय रुग्णांपैकी २० रुग्ण ऑक्सिजनवर, तर ९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १६, दोडामार्ग १९, कणकवली ६३, कुडाळ ९५, मालवण ४९, सावंतवाडी ५०, वैभववाडी १७, वेंगुर्ले २०, जिल्ह्याबाहेरील ४.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४४७ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७८, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९६, कुडाळ – २४१, मालवण – २८८, सावंतवाडी – २०१, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड