रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २८ ऑक्टोबर) करोनाचे १५ नवे रुग्ण आढळले, तर २५ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आता केवळ १७० जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे १५ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ८७९ झाली आहे. आज २५ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार २३६ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.६५ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६२२ नमुन्यांपैकी ६१४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ८ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ९२२ नमुन्यांपैकी ९१५ अहवाल निगेटिव्ह, तर ७ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ५ हजार २३८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज १७० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ८३, तर लक्षणे असलेले ८७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७० आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात १०० जण आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १३, डीसीएचसीमधील ३८, तर डीसीएचमध्ये ४९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ३४ जण ऑक्सिजनवर, १७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ५.२६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४७२ आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२०, खेड २२६, गुहागर १७२, चिपळूण ४७६, संगमेश्वर २१९, रत्नागिरी ८२५, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४७२).
२७ ऑक्टोबरपर्यंतच्या स्थितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील ९ लाख १४ हजार ८५० जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचाा पहिला डोस घेतला असून, ३ लाख ८४ हजार ९०७ जणांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. अशा रीतीने लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या १२ लाख ९९ हजार ७५७ आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media