Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा केवळ एक नवा रुग्ण, मृत्यूची नोंद नाही

person with a face mask and latex gloves holding a globe

Photo by Anna Shvets on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (५ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार आज नवा केवळ एकच रुग्ण जिल्ह्यात आढळला. आज एकाची मृत्यूची नोंद झाली नाही. आजही एकही रुग्ण करोनामुक्त होऊ शकला नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या ४८ सक्रिय रुग्ण आहेत.

आज आढळलेला नवा करोनाबाधित रुग्ण देवगड तालुक्यातील आहे.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ४८ रुग्णांपैकी ७ रुग्ण ऑक्सिजनवर, तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९, दोडामार्ग १, कणकवली ७, कुडाळ ११, मालवण १०, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले ५, जिल्ह्याबाहेरील ०.

आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५८ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version