pexels-photo-3952231.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही, करोनामुक्त नाही, मृत्यूही नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार एकही नवा रुग्ण आढळला नाही. तसेच एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंदही झाली नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात केवळ ७४ सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ७४ रुग्णांपैकी ८ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग ८, कणकवली २२, कुडाळ १०, मालवण ७, सावंतवाडी १२, वैभववाडी ३, वेंगुर्ले ६, जिल्ह्याबाहेरील १.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५७ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९८, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply