Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही

pexels-photo-3952231.jpeg

Photo by cottonbro on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (२४ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या १३ असून आतापर्यंत ५१ हजार ७५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २२७ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग २, कणकवली ५, कुडाळ ३, मालवण १, सावंतवाडी १, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.

एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६४ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version