pexels-photo-3952231.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा एकच नवा रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकच नवा रुग्ण आढळला. त्याची जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी झाली होती.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. १ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात एकाच रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १३४ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही किंवा चिंताजनक अवस्थेतही नाही. आज सहा रुग्ण बरे झाल्याने घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ३५७ रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ६९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५२७ एवढीच आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ०, दोडामार्ग ०, कणकवली ०, कुडाळ ०, मालवण ०, सावंतवाडी १, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग ५, कणकवली ४, कुडाळ ३६, मालवण ५३, सावंतवाडी १३, वैभववाडी १, वेंगुर्ले ११, जिल्ह्याबाहेरील ५.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८५, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१९, कुडाळ – २५४, मालवण – २९९, सावंतवाडी – २१६, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply