Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची टक्केवारी ९६.९७

person with a face mask and latex gloves holding a globe

Photo by Anna Shvets on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांची टक्केवारी ९६.९७ टक्के झाली आहे. आज (दि. २८ फेब्रुवारी) करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले, तर २५ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४३६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ८७५ म्हणजे ९६.९७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १११ पैकी ११० निगेटिव्ह, तर एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ५१ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २५ हजार ४०० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले २०, तर लक्षणे असलेले ७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात २०, तर संस्थात्मक विलगीकरणात ७ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ४, तर डीसीएचमध्ये ३ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तसेच अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण नाही.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ६.४५ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात आज, २७ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने तसेच पल्स पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे करोनाप्रतिबंधक लसीकरणाचे केवळ एकच सत्र पार पडले. त्यात ३ जणांनी लशीचा पहिला, तर ७ जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ९० जणांचा पहिला, तर ८ लाख ५८ हजार ६७९ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख १ हजार ६५२ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version