चिपळूणमध्ये बुधवारी मुलांना शिकायला शिकविणारे व्याख्यान

चिपळूण : विद्याभारतीतर्फे चिपळूण येथे बुधवारी (दि. २० एप्रिल) पालकांकरिता ‘मुलांना शिकायला शिकवा’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिलीप बेतकेकर

आज स्पर्धेचे युग आहे, असे म्हटले जाते. या स्पर्धेत मुलांनी टिकले पाहिजे, असेही आपण मानतो. पण यासाठी पालक काही पूर्वतयारी करतात का, हा प्रश्न आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो आहे. पण कोणते प्रयत्न करतो आहोत, हेही महत्त्वाचे आहे. मुलांना कोणत्या शाळेत घालायचे, कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचे, शाळेचे शुल्क, दर्जा, शिकवणी, मुलांचा अभ्यास करून घेणे अशा स्वरूपाचे हे प्रयत्न असतात. पण हे खरेच पुरेसे आणि योग्य आहे का, हे तपासणे गरजेचे आहे.

अभ्यास म्हणजे केवळ वाचन, लेखन नसून त्यात सातत्यपूर्ण सराव, मनन, चिंतन, आकलन, स्मरण हे सर्व अपेक्षित आहे. तेही स्वयंप्रेरणेने होणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात हाच ‘सेल्फ स्टडी’ अपेक्षित आहे. यात धाकदपटशा, जबरदस्ती उपयोगी पडत नाही. कारण त्यामुळे मुलाला अभ्यासाची आवड निर्माण होण्याऐवजी भीती निर्माण होते. यासाठी मुलांना शिकायला शिकविणे आवश्यक आहे.

हेच कसे करायचे, हे समजवून देण्यासाठी विद्याभारतीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, गोवा राज्याचे माजी शिक्षण सल्लागार, शिक्षणतज्ज्ञ दिलीप बेतकेकर यांचे व्याख्यान येत्या बुधवारी, २० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आले आहे. चिपळूणमध्ये सरस्वती शिशुमंदिर (ओक अॅकॅडमीसमोर, परशुराम नगर, डीबीजे कॉलेजजवळ) येथे हे व्याख्यान होईल. पालकांसाठी ही सुवर्ण संधी असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्याभारतीतर्फे करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply