आकाशवाणीच्या एआयआरनेक्स्ट वक्तृत्व स्पर्धेत सिमरन, अमित विजयी

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसारभारतीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे एआयआरनेक्स्टअंतर्गत लांजा येथे आज (ता. झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सिमरन शेख हिचा पहिला, तर अमित पवार याचा दुसरा क्रमांक आला.

स्पर्धेसाठी ‘स्वातंत्र्य चळवळ आणि पत्रकारिता’, ‘एका स्वातंत्र्य सैनिकाचं मनोगत’ आणि ‘आजची प्रसारमाध्यमं – वास्तव आणि अपेक्षा’ हे विषय देण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लांजा येथील महाविद्यालयात आज ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी ‘स्वातंत्र्य चळवळ आणि पत्रकारिता’, ‘एका स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत’ आणि ‘आजची प्रसारमाध्यमे – वास्तव आणि अपेक्षा’ हे विषय देण्यात आले होते. स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. आपली मते विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे मांडली. स्पर्धेसाठी राजेश गोसावी आणि प्रजाप माने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त प्रसारभारतीच्या आकाशवाणीच्या वतीने संपूर्ण देशभर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून युवकांची मते त्या निमित्ताने मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. लांजा महाविद्यालयातील विजेत्यांच्या सहभागावर आधारित विशेष कार्यक्रम रविवार, दिनांक ८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणार आहे.

आजच्या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर, कार्यक्रम अधिकारी समन्वयक नंदादीपक बट्टा, प्रा. डॉ. राहुल मराठे, प्रा. डॉ. महेश बावधनकर, उपप्राचार्य काशिनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले तर स्पर्धाविषयक माहिती संजना कानागल यांनी दिली. आभारप्रदर्शन नंदादीपक बट्टा यांनी तर सूत्रसंचालन संजना कानागल
यांनी केले. मनोज जॉर्ज, संजय चव्हाण आणि विकास बडकस यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply