रत्नागिरी : राज्यात प्रथमच घेण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या समुद्रकिनाऱ्यावरील कुस्ती स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन, मांडवी पर्यटन संस्था आणि जयभैरव नवरात्र उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्यावरील कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. काल (दि. २२ मे) रात्री ही स्पर्धा मांडवी किनाऱ्यावर उत्साही वातावरणात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत ५० मुले आणि २० मुलींनी सहभाग घेतला. कुमार गट (३० किलो), वरिष्ठ गट, महिला कनिष्ठ व वरिष्ठ, ७० किलो वजनी गट, ८० किलो वजनी गट, खुला गट अशा गटांत स्पर्धा झाली. डावप्रतिडावांनीी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचा निकाल असा – (विजेता आणि उपविजेता)-कुमार गट (30 किलो) पार्थ नागवेकर (रत्नागिरी), आदित्य पवार (रत्नागिरी). कुमार गट (30 किलो पुढील) पार्थ माटे (चिपळूण), यश जावळे (चिपळूण), वरिष्ठ गट (60 किलोपर्यंत) किरण घाग (चिपळूण), भावेश सावंत (रत्नागिरी), 70 किलोपर्यंत – महंमद शेख (चिपळूण), केतन शिर्के (रत्नागिरी), 80 किलोपर्यंत- साहिल खटकूळ (रत्नागिरी), संदीप गुरव (रत्नागिरी), खुला गट- मारुती बिर्जे (रत्नागिरी), सुयोग कासार (रत्नागिरी), मुली कुमार गट- नेहा दुधाळ (खेड), सलोनी ठसाळे (चिपळूण), वरिष्ठ गट- मोनिका घाग (चिपळूण), कमल नितोरे (रत्नागिरी).
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाई विलणकर, राजीव कीर, सदानंद जोशी, चंद्रशेखर केळकर, अमित विलणकर, संतोष कदम, आनंद तापेकर, वैभव चव्हाण, फैयाज खतीब, अंकुश कांबळे, योगेश हार्चेकर, नितीन तळेकर, माजी नगरसेवक बंटी कीर, प्रसन्न सुर्वे, निलेश वारंग आदींनी विशेष प्रयत्न केले. अमित पेडणेकर यांनी स्पर्धा स्थळाशेजारी तयार केलेल्या वाळू शिल्पाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेतील कुस्त्यांची झलक पाहा पुढील लिंकवर…
…..
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड