रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर १५ ऑगस्टपर्यंत रद्दच

नवी मुंबई : करोनाच्या काळात बंद करण्यात आलेली रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी ही कोकण रेल्वेची पॅसेंजर गाडी (क्र. 10101 / 10102) येत्या १५ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ही गाडी ३० जूनपर्यंत धावणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र हा कालावधी येत्या १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला असल्याचे कोकण रेल्वेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, डबल डेकरला वाढीव दोन डबे जोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेमार्गावर शुक्रवार वगळता इतर दिवशी दररोज वेगवेगळ्या क्रमांकांनी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव आणि परत या मार्गावर धावणाऱ्या डबल डेकर गाडीला येत्या 31 जुलैपर्यंत दोन जादा डबे जोडण्यात येणार आहेत. गाडीला सध्या बारा एलएचबी डबे आहेत. त्यामध्ये एक एसी टू टायरचा आणि एक एसी चेअर कारचा असे दोन डबे वाढविण्यात आले आहेत. या 14 एलएचबी डब्यांसह ही गाडी 31 जुलैपर्यंत धावणार आहे, असे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply