Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १८, रुग्ण, १९ जण करोनामुक्त

coronavirus

Photo by CDC on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ जुलै) करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ९०६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८२ हजार २७९ म्हणजे ९६.९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आरटीपीसीआरसाठी ७३ नमुने पाठवले. त्यातील ६८ निगेटिव्ह, तर ५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी १९८ जणांचे नमुने पाठविले होते. त्यापैकी १८५ निगेटिव्ह, तर १३ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ५४ हजार २८५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९१ रुग्णांपैकी लक्षणे नसल्याने ७१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर लक्षणे असलेले १८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दोन रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली आहे.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि ७, तर डीसीएचमध्ये ११ रुग्ण उपचार घेत आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण दाखल नाही. बाधितांपैकी एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण नाही.

जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्युदर २.९९ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version