डोळ्यांची साथ आली आहे, हे जाणून घेऊन स्वतःला कसे वाचविता येईल, याविषयी विरार (जि. पालघर) येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी माहिती दिली आहे. प्रश्नोत्तर स्वरूपातील ही माहिती अशी –
प्रश्न : डोळे कसे येतात?
उत्तर : डोळे आलेल्या माणसाच्या डोळ्यांतून जे पाणी येते, त्यात हा आजार करणारे जिवंत कण असतात.
त्यांना १० हजार पट मोठे केले की ते दिसतात. त्यांना विषाणू म्हणतात. आपल्याला सर्दी, करोनासारखे आजारही विषाणुंनी होतात.
या विषाणुंनी नाकाला त्रास दिला की ते गळते. त्याला आपण सर्दी म्हणतो. डोळ्यांना त्रास दिला की ते लाल होतात. सुजतात. खुपतात. गळतात. लाल होतात. डोळ्यांना खाज येते. आधी १ डोळा गळतो. मग दुसरा. आपण धीर ठेवावा. त्रास सहन करावा. याला तितिक्षा म्हणतात.
प्रश्न : आलेले डोळे बरे व्हायला किती दिवस लागतात?
उत्तर : अगदी तीन-चार ४ दिवसांत आपण बरे होतो. १० पैकी ९ असे बरे होतील. असे झाले नाही, किंवा त्रास वाढला तर डॉक्टरकडे जा. गेली ४० वर्षे मी कुणालाही औषध दिलेले नाही. स्वतःही घेतले नाही. आम्ही सर्व बरे झालो. पैसे वाचले. औषधांचा त्रास वाचला.
प्रश्न : डोळे आले, तर कोणती औषधयोजना करावी?
उत्तर : हा आजार विषाणूंनी होतो. साध्या पाण्याने डोळे धुवावे. याला अँटीबायोटिक थेंब जरुरी नाही. स्टिरॉइड थेंबाने हानी होऊ शकते. त्यामुळे ते शक्यतो टाळावे. योग्य ती काळजी घेतली, तर औषधांची गरजच नसते.
प्रश्न : घरी इतरांना डोळे येऊ नयेत म्हणून काय करावे?
उत्तर :
आपले डोळे आल्यावर आपण हात लावलेल्या ठिकाणी दुसऱ्याने हात लावला की त्यांचे डोळे येऊ शकतात. उदाहरणार्थ दाराची कडी, फोन, आदी. या सर्वांपासून दूर राहावे. आपले कपडे, भांडी अलग ठेवावी. आपण धुवावी. डोळे आले तर ते संपूर्ण बरे होईपर्यंत घरी राहावे. बाहेर जाऊन आपल्याच लोकांना आजार देऊ नये. तशी सावधगिरी बाळगली, तर आपल्यामुळे आजार पसरणार नाही. ही सर्वोत्तम देशसेवा आहे. करोनासाठी जर जे जे केले, तेच करून डोळ्यांची साथ थांबवू या. हे सर्वाँना सांगा. हे आपण न सांगितल्याने मित्रांची हानी झाली तर आपण जबाबदार. हे सर्वांचे डोळे येण्याआधी सर्वाँना सांगा.

