रत्नागिरीत शनिवारी महिला आरोग्य शिबिराचा दुसरा टप्पा

रत्नागिरी : येथे नुकत्याच पार पडलेल्या महिला आरोग्य तपासणी शिबिराची सांगता आणि नव्या शिबिराचा प्रारंभ उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (दि. १५ ऑक्टोबर) होणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने तसेच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी शहरातील माता – भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर ७ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान झाले. या शिबिरामध्ये रत्नागिरीतील ८५६ महिलांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. जिल्ह्यात प्रथमच महिलांनी आरोग्य शिबिराला इतक्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्याबाबतची सजगता निर्माण झाल्याचे निष्पन्न झाले.

या शिबिराची सांगता आणि आरोग्य तपासणी शिबिराच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ शनिवारी होणार आहे. यावेळी सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या महिलांचे आरोग्य तपासणी अहवाल वितरण, आवश्यकतेनुसार औषध वितरण तसेच त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व सहभागी महिलांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम हॉटेल विवेक मैदान हॉलमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी माजी नगरसेविका सौ. स्मितल पावसकर (9421230177), सौ. शिल्पा सुर्वे (8975838180), सौ. कांचन नागवेकर (9307849998), सौ. राजेश्वरी शेट्ये (9970246357), सौ. वैभवी खेडेकर (7020260542), सौ. दिशा साळवी (9860885085), सौ. कौसल्या शेट्ये (7030501111), सौ. दया चवंडे (9860626129), सौ. श्रद्धा हळदणकर (9422431815) यांच्याशी संपर्क साधावा.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply