होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर गुजरातमधून दोन जादा गाड्या

नवी मुंबई : होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर गुजरातमधून उधना तसेच अहमदाबाद येथूनही विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच पनवेल येथून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या होळी स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आता गुजरातमधूनही जादा गाड्यांची घोषणा झाली आहे.

यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. स्पेशल फेअर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. विशेष भाड्यासह उधना जंक्शन येथून १ मार्च आणि ५ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुटेल आणि ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. बावीस डब्यांची ही गाडी कोकणातील पुढील स्थानकांवर थांबेल (कंसात गाडीची वेळ) – पालघर (रात्री १०.१४), वसई रोड (रात्री ११.१०), पनवेल (मध्यरात्रीनंतर १२.५५), रोहा (पहाटे २.२५), माणगाव (पहाटे २.५२), खेड (पहाटे ३.५४), चिपळूण (पहाटे ४.१८), सावर्डे (पहाटे ४.३२), संगमेश्वर रोड (पहाटे ४.४२), रत्नागिरी (सकाळी ५.३०), राजापूर रोड (सकाळी ६.३८), वैभववाडी रोड (सकाळी ७.००), कणकवली (सकाळी ७.३४), सिंधुदुर्ग (सकाळी ७.४६), कुडाळ (सकाळी ७.५८), सावंतवाडी (सकाळी ८.२०).

परतीच्या प्रवासासाठी ही गाडी क्र. ०९०५८ मंगळुरू जंक्शन येथून २ आणि ६ मार्च रोजी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. तिचे कोकणातील स्थानकांवरील वेळापत्रक असे – (कंसात वेळ) – सावंतवाडी (पहाटे ३.२०), कुडाळ (पहाटे ३.४०), सिंधुदुर्ग (पहाटे ३.५४), कणकवली (पहाटे ४.१०), वैभववाडी (पहाटे ४.३८), राजापूर (पहाटे ५.००), रत्नागिरी (सकाळी ६.३५), संगमेश्वर (सकाळी ७.०८), सावर्डे (सकाळी ७.२६), चिपळूण (सकाळी ७.४८), खेड (सकाळी ८.१०), वीर (सकाळी ९.१८),माणगाव (सकाळी ९.३२), रोहा (सकाळी ११.४०),पनवेल (दुपारी १२.५०), वसई (दुपारी २.५०).

दुसरी विशेष गाडी क्र. ०९४१२ अहमदाबाद जंक्शन – करमळी आणि परत सुपरफास्ट विशेष भाड्यासह साप्ताहिक पद्धतीने चालवली जाईल. गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद जंक्शन येथून मंगळवारी, ७ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २५ वाजता करमळीला पोहोचेल. ही गाडी कोकणातील पुढील स्थानकांवर थांबेल (कंसात गाडीची वेळ) – पालघर (दुपारी ३.१५), वसई रोड (दुपारी ३.५५), पनवेल (सायंकाळी ५.२०), रोहा (सायंकाळी ६.४५), माणगाव (सायंकाळी ७.२०), खेड (रात्री ८.४६), चिपळूण (रात्री ९.१२), सावर्डे (रात्री ९.३०), संगमेश्वर रोड (रात्री ९.५६), रत्नागिरी (रात्री १०.४०), आडवली (रात्री ११.१४), विलवडे (रात्री ११.३४), राजापूर रोड (रात्री ११.४८), वैभववाडी रोड (मध्यरात्रीनंतर १२.०२), नांदगाव (मध्यरात्रीनंतर १२.२०), कणकवली (मध्यरात्रीनंतर १२.३६), सिंधुदुर्ग (मध्यरात्रीनंतर १२.५०), कुडाळ (मध्यरात्रीनंतर १.०२), सावंतवाडी (मध्यरात्रीनंतर १.३०).

या गाडीचे कोकणातील वेळापत्रक असे (कंसात वेळ) – सावंतवाडी (सकाळी १०.१०), कुडाळ (सकाळी १०.२८), सिंधुदुर्ग (सकाळी १०.४०), कणकवली (सकाळी १०.५४), नांदगाव (सकाळी ११.०६), वैभववाडी (सकाळी ११.२२), राजापूर (सकाळी ११.३८), विलवडे (सकाळी ११.५४), आडवली (दुपारी १२.१०), रत्नागिरी (दुपारी १.००), संगमेश्वर (दुपारी १.४४), आरवली (दुपारी २.०२), सावर्डे (दुपारी २.१४), चिपळूण (दुपारी २.५०), खेड (दुपारी ३.२०), माणगाव (सायंकाळी ५.००), रोहा (सायंकाळी ६.५५), पनवेल (रात्री ८.०५), वसई (रात्री ९.५५), पालघर (रात्री १०.३३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply