रत्नागिरीत ५ मे रोजी युवाशक्ती करिअर शिबिर

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या ५ मे रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने हे शिबिर आयोजित केले आहे.

शिबिरात दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण आणि अभ्यासक्रम, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आणि कर्ज योजनांची माहिती दिली जाईल. तसेच करिअर प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ५ मे रोजी होणार असलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होईल. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या शिबिराचा अधिकाधिक तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आणि रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्या श. ग. कोतवडेकर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply