स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून डॉ. तानाजीराव चोरगे यांचे अभिनंदन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना इंटलिक्चुअल पीपल्स फाउंडेशनचा बेस्ट चेअरमन अ‍ॅवॉर्ड प्राप्त झाला. यानिमित्ताने स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी त्यांचे अभिनंदन केले.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला डॉ. चोरगे यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्व सहकारी संस्थांची पालक बँक आहे. या बँकेच्या अध्यक्षांना देशपातळीवरील सन्मान मिळाल्याचा अभिमान सर्व सहकारी पतसंस्थांना आहे, असे या भेटीत अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

यावेळी स्वरूपानंद पतसंस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply