दीपक पटवर्धन यांना ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया सन्मान

पुणे : येथील शानदार समारंभात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांना ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया सन्मान आज प्रदान करण्यात आला.

कॉसमॉस बँक आणि ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध मान्यवरांना सन्मानित केले. सहकार क्षेत्रात प्रदीर्घ उत्तम कामगिरीबद्दल अॅड. दीपक पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. राज्यउत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्वरूपानंद पतसंस्थेचे नेतृत्व करत प्रदीर्घ काळ केलेली सातत्यपूर्ण प्रगती, सहकाराची ताकद ओळखत केलेली भांडवल निर्मिती विश्वासार्हते चा मानदंड, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये दीर्घ काळ संचालक म्हणून केलेले काम, राज्य पतसंस्था फेडरेशन या संघ संस्थेच्या कार्याध्यक्षपदापर्यंत मारलेली धडक, महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात ३० वर्षे केलेले रचनात्मक काम, गोवा शिपयार्ड कंपनीवर केंद्र शासन संरक्षण खात्याने इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून केलेली नियुक्ती या सर्वांची सचित्र आढावादर्शक चित्रफीत दाखवत पटवर्धन यांना सन्मानित केले गेले.

प्राप्त झालेला हा पहिला वहिला सन्मान माझे कुटुंबीय तसेच महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला समर्पित करतो, असे पटवर्धन यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply