रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी गणेशोत्सवातील आगळ्या देखाव्याचे वेगळेपण सलग पंधराव्या वर्षीही जपले असून यावर्षी त्यांनी इको-फ्रेंडली देखाव्यातून भारतीय सेनेला मानवंदना केली आहे.
रात्रंदिवस आपल्या प्राणांची तमा न बाळगणाऱ्या सैनिकांना मानवंदना सैनिकांच्या वेशातील बाप्पा संजय वर्तक यांनी साकारला आहे. भारताच्या संरक्षण दलामधील वायुदल, नौदल आणि भारतीय सेना देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात. कुटुंबाचा त्याग करून देशवासीयांना सुखाची झोप मिळावी, यासाठी सीमेवर तैनात असणारी हीच देवमाणसे भारतवासीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. अशा या भारतीय सेनेला अभिवादनासाठी वर्तक कुटुंबीयांनी हा देखावा साकारला आहे.
देखाव्यात गणपती दुचाकीवर बसलेला आहे. मागील बाजूला भारताचा नकाशा असून त्यावर तिन्ही सैन्य दलांची बोधचिन्हे साकारण्यात आली आहेत. देशभक्तिपर पार्श्वसंगीतामुळे देखाव्याचा उद्देश उत्तमरीत्या साधला गेला आहे.
हा देखावा पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण श्री. वर्तक यांनी दिले असून त्यांचा पत्ता असा –
१५८, दुर्वांकूर, उत्कर्ष नगर, वैभव सोसायटी,
कुवारबाव, रत्नागिरी
(संपर्क क्र. – 9421231963, 8446274460, 7745807071)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड