अ. भा. मसापच्या नाशिक शाखेची काव्यवाचन नावनोंदणी सुरू

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे होणार असलेल्या बाराव्या ग्रामीण आणि नवोदित मराठी भाषिक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाकरिता काव्य-वाचन सहभाग नावनोंदणी सुरू झाली आहे.

अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दरवर्षी ग्रामीण आणि नवोदित साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यंदाही हे साहित्य संमेलन येत्या नोव्हेबर महिन्यात होणार आहे. संमेलनाचे हे बारावे वर्ष आहे. यानिमित्ताने मराठी भाषिक कवींना काव्य-वाचनाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याची नावनोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहभागी कवींनी आपल्या किमान २ कविता पाठवणे बंधनकारक आहे. कविता वादग्रस्त, अश्लील वा बीभत्स नसावी. कवितेसोबतच कवींनी थोडक्यात परिचय, फोटो व संपर्क नंबर अवश्य पाठवावा. निवड झालेल्या प्रत्येक कवीला सादरीकरणासाठी ३ मिनिटे वेळ दिला जाईल. कवितेची निवड झाल्यास प्रत्यक्ष वा व्हॉट्स अॅपद्वारे कळवले जाईल. कविता पाठविण्याची अंतिम मुदर ३० सप्टेंबर २३ पर्यंत आहे. निवड झालेल्या व प्रत्यक्ष काव्यवाचन करणाऱ्या कवीला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

कवितेची निवड झाल्याचे ऑक्टोबर महिन्यात कळवले जाईल. किमान १ कविता २०२४ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या साहित्य परिषद दिवाळी अंकासाठीही शक्य झाल्यास घेतली जाईल. साहित्य संमेलनाची तारीख, स्थळ आणि वेळ नंतर जाहीर होणार आहे, असे जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन गायकर (9763827708, 9881329709) यांनी कळविले आहे.

नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी माणिकराव गोडसे (कविता विभाग प्रमुख, तथा उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, नाशिक जिल्हा, संपर्क क्रमांक – 9822874448), शांताराम वाघ (तालुकाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, नांदगाव तालुका, नाशिक जिल्हा संपर्क क्रमांक – 8087493453) किंवा श्रीराम तोकडे (तालुकाध्यक्ष, साहित्य परिषद इगतपुरी तालुका, नाशिक जिल्हा, संपर्क क्रमांक – 9260780685).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply