दिवाळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर एलटीटी-मंगळुरू विशेष गाडी

नवी मुंबई : दिवाळीच्या सणामुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि दक्षिण रेल्वेने कोकण मार्गावर विशेष एलटीटी-मंगळुरू विशेष साप्ताहिक गाडी सोडण्याचे नियोजन केले आहे.

याबाबत कोकण रेल्वेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गाडी क्र. 01185 /01186 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरू साप्ताहिक गाडी येत्या शुक्रवारपासून (दि. २० ऑक्टोबर) धावणार आहे. एलटीटीहून २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता मंगळुरूला पोहोचेल. एलटीटी मंगळूरू प्रवासात कोकणात या गाडीच्या पोहोचण्याच्या वेळा अशा – ठाणे रात्री १० वाजून ३५ मिनिटे, पनवेल २३.३५, रोहा मध्यरात्रीनंतर १ वाजता, माणगाव १.३६, खेड २.४४, चिपळूण ३.०८, संगमेश्वर ३.५२, रत्नागिरी ४.३५, कणकवली ६.२८, सिंधुदुर्ग ६.४८, कुडाळ ७, सावंतवाडी ७ वाजून २२ मिनिटे.

परतीच्या प्रवासाकरिता मंगळुरूहून ही गाडी २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता सुटेल आणि रविवारी दुपारी अडीच वाजता एलटीटीला पोहोचेल.

गाडी कोकणात ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडीला थांबेल. गाडीला २१ डबे असतील. त्यात टू टायर एसीचा एक, थ्री टायर एसीचे पाच, स्लीपरचे आठ, तर सर्वसाधारण पाच डबे असतील.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply