Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

संगमेश्वर स्थानकात नऊ गाड्यांच्या थांब्यासाठी मागणी पत्रांचा धडाका

Advertisements

संगमेश्वर : कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड स्थानकावर एकूण ९ गाड्यांना थांबा द्या असे आवाहन निसर्गरम्य चिपळूण व निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले. त्यासाठी आता मागणी पत्रांचा धडाका लावण्यात आला आहे.

संगमेश्वरवासीय जनतेकडून दोन संस्थांच्या आवाहनाला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत हजारोंच्या वर पत्रे कुरियर, पोस्टाच्या माध्यमातून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविण्यात आली आहेत. अजूनही जनतेच्या आशीर्वादाचा व पत्रांचा ओघ वाढतोच आहे. या पत्रप्रपंचाने सरकारला जाग येईल, असा विश्वास ग्रुप चे प्रमुख तथा पत्रकार संदेश जिमन यांनी व्यक्त केला आहे,

या दोन ग्रुपने रेल्वे प्रशासनाकडे संगमेश्वरसाठी एलटीटी मडगाव एक्स्प्रेस, जामनगर, जबलपूर, गांधीधाम, कोचुवेली, वेरावळ, जनशताब्दी, तेजस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळण्याची मागाणी केली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरसुद्धा आमच्या आंदोलनात सहभागी होत असून त्यांचासुद्धा वाढता पाठिंबा आम्हाला मिळत आहे. त्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपकडून सर्वांचे आभार मानले असून यापुढेही असेच सर्वांचे सहकार्य असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version