नागपूर-मडगाव रेल्वेला संगमेश्वर रोड थांबा मिळविण्यात यश

रत्नागिरी : नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष साप्ताहिक गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याच्या निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या मागणीला यश आले आहे.

ही विशेष गाडी गणपती उत्सवाच्या काळात सुरू झाली त्यावेळी गाडीला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाचा थांबा होता. गणपतीनंतर ही गाडी कायमची करणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र संगमेश्वर रोड स्थानकाचा थांबा रद्द करण्यात आला. या अन्यायाला वाचा फोडण्याची लढाई निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेशजी जिमन आणि त्यांचे सहकारी यांनी सुरू केली. त्यांनी कोकण रेल्वेच्या विविध विभागांशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न उच्च स्तरावर मांडला. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात सीएमडी संजय गुप्ता यांना त्या संदर्भातील पत्र दिले. तसेच विभागीय आमदार शेखर निकम यांच्याशीही यासंदर्भात चर्चा केली.

या सर्व प्रयत्नांना यश आले आङे. कोकण रेल्वेने नवीन आदेश काढले असून नोव्हेंबरपासून नागपूर-मडगाव-नागपूर या द्वि-साप्ताहिक गाडीला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. सर्व संगमेश्वरवासीय प्रवाशांनी या साप्ताहिक गाडीचे जास्तीत जास्त आरक्षण करून त्याचा लाभ घ्यावा. त्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन थांबा कायमस्वरूपी ठेवता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply