नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या संगमेश्वर थांब्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्रे

संगमेश्वर : कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा या दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना संगमेश्वर तालुक्यातून असंख्य पत्रे पाठविण्यात आली आहेत.

या मागणीसाठी गेली तीन वर्षे निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेस ग्रुप सातत्याने प्रयत्न करत आहे कोकण रेल्वे प्रशासन वेळोवेळी विविध सबबी सांगून आडमुठेपणा दाखवत आहे. या लढ्यात आजवर संगमेश्वरमधील प्रवासीवर्गाने तसेच जनतेने खूप साथ दिली. या ग्रुपकडून गेली तीन वर्षे कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयाच्या पायर्‍या झिजवल्या आहेत. अनेकवेळा तेथे जाण्याचा प्रसंग आला. परंतु तेथील प्रमुख अधिकाऱ्यांनी काहीच हालचाल केली नाहीत. प्रवाशांच्या या मागणीची त्यांना दखलही घ्यावीशी वाटली नाही. म्हणूनच आता संगमेश्वरवासीय जनतेनेसुद्धा या आंदोलनात उतरण्याचे ठरविले आहे.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात संयुक्त बैठक घेण्याबाबतची हजारो मागणी पत्रे धाडण्याचा सपाटा संगमेश्वरवासीय जनतेकडून होत आहे. तालुक्यातील विविध स्तरातील नागरिक यासाठी मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्रे पाठवून थांब्यासाठी पाठपुरावा करत आहेत. संतोष खातू (9860353231) आणि दादू भिंगार्डे (9890371415) यांना संगमेश्वर बाजारपेठेत, येथे, तर देवरूखमध्ये निखिल कोळवणकर (9420907388) यांच्याशी संपर्क करून आपले संगमेश्वर रेल्वे थांब्याबाबतचे अर्ज घेऊन ते भरून द्यावेत आणि या अभियानाला भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply