Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकाद‌मीतर्फे संवादमाला

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे येत्या सोमवारी, दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘संवादमाला’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या नवीन वर्षामध्ये अकादमीमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश गाठलेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने प्रत्येक महिन्यात एका मान्यवरासोबत ‘संवाद‌माला’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये ही संवादमाला होणार आहे. या संवादमालेसाठी मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक परीक्षार्थी, विद्यार्थी आणि पालक यांनी या सेमिनारचा फायदा घ्यावा, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version