
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अधिकाधिक ठेवीदारांना ठेव ठेवण्यास उद्युक्त करावे. यासाठी ‘स्वरूप ठेव मानांकन उपक्रम’ आज राबविण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
आजच्या एका दिवसात किमान १०० नवीन ठेवीदारांच्या ठेवी संस्थेमध्ये जमा व्हाव्यात, असा प्रयत्न होता. या प्रयत्नाला ठेवीदारांनी १०० टक्के यश दिले. दणक्यात बरसणाऱ्या आषाढधाराही ठेवीदारांना संस्थेत पोहोचण्यापासून परावृत्त करू शकल्या नाहीत. ठेवीदारांनी स्वरूपानंद पतसंस्थेत १ कोटी ८२ च्या ठेवी जमा केल्या. यापैकी १०७ ठेवीदार संपूर्णपणे नवे ठेवीदार असून संस्थेचा १०० नव्या ठेवीदारांचा संकल्प एका दिवसात पूर्ण झाला. या ठेववृद्धीमासात आजअखेर ९०० ठेव खाती सुरू झाली असून ही संख्या १००० च्या वर जाईल, असा विश्वास अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३५० कोटींचा ठेवटप्पा गाठण्याचे उद्दिष्ट मनात धरून आज ३२० कोटीपर्यंतचा टप्पा पूर्ण होईल, तर २० जुलैपर्यंत ३२५ कोटींचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे श्री. पटवर्धन म्हणाले.
ते म्हणाले, आजचा दिवस रोचक होता. कर्मचारी, अधिकारी वर्गाने प्रामाणिकपणे राबवलेले संपर्क अभियान फलद्रूप झाले. प्रत्येक शाखेत किमान १० ते १५ ठेव खाती नव्याने सुरू झाली. सकाळपासून वरुणराज दणक्यात बरसत होते. त्यामुळे ठेव संकलनावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती मनात होती. पण सकाळपासूनच ठेवीदारांचा प्रतिसाद प्राप्त होत होता आणि पाहता पाहता १०० नवीन खातेदारांचा इष्टांक पूर्ण होऊन दिवसअखेरीस २२१ ठेवीदारांनी एकाच दिवसात १ कोटी ८२ लाखांची गुंतवणूक स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत केली गेली.
अजूनही ठेववृद्धी मासाचे ४ दिवस शिल्लक असून २० जुलैपर्यंत ठेवीदारांनी आकर्षक व्याजदराचा लाभ घेऊन मोठी गुंतवणूक स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये करावी, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

