अशी केली पितरांची आठवण

सध्या पितृपक्ष सुरू आहे. या काळात पितरांच्या आठवणीसाठी अन्नदानाची प्रथा आहे. विनय सौदागर (आजगाव, सावंतवाडी) यांनी ज्ञानदान करून आगळ्या पद्धतीने आपल्या पितरांची आठवण केली.
………….

बाबांना जाऊन २० वर्षं झाली. जन्मूनही या वर्षी १०० वर्षे झाली आहेत. मी म्हाळ घालत नाही. अलीकडे आमान्नही देत नाही. माणगावच्या दत्तमंदिरात आईबाबांच्या तिथीदिवशी अन्नदान व्हावं, म्हणून पैसे भरलेत; ते आता पुरेसं वाटतं.

यंदा बाबांचं जन्मशताब्दी वर्ष मात्र साजरं केलं (३० ऑगस्ट २३ ते ३० ऑगस्ट २४). दर महिन्याला आम्ही एक उपक्रम राबवला.
१. संस्कारवर्ग – रामरक्षा,भगवद्गीता पठण.
मुलांना पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर भेट
२. आंबिये सर वाचन कट्टा : विवेक आंबिये यांची उपस्थिती
कंपास पेट्या, वह्या भेट
३.रांगोळी मार्गदर्शन – सविता जोशी
रांगोळी साहित्य भेट
४.वाचन साधना कार्यशाळा
मार्गदर्शन – सुभाष शेटगावकर
५. आकाश निरीक्षण
डायरी भेट
६. आजगाव हायस्कूलला बँड वाद्य संच भेट
७. आजगाव हायस्कूलच्या आठवीच्या वर्गाला ‘श्यामची आई’ पुस्तक भेट
८. पंचांग वाचन
दाते पंचांग भेट
९. हस्ताक्षर सुधार मार्गदर्शन
पेन भेट, इंग्लिश डिक्शनरी, कंपास भेट
१०. संवादिनीची तोंडओळख कार्यशाळा
११. पोस्टल व्यवहाराची तोंडओळख
पोस्ट कार्ड, आंतरदेशीय स्टँप भेट
१२. अध्यात्म ध्यान सेवा केंद्राची स्थापना

तेरावा सांगता कार्यक्रम बाबांच्या जन्मगावी (शिसामुंडगा) येथील मयेकर वाड्यातील दत्तमंदिरात केला. शेखर पणशीकर यांचं गायन होतं. त्यात बाबांची नात/माझी मुलगी मुग्धाही गायली.

बाबांच्या जन्मस्थानाकडे तसं आमचं दुर्लक्ष झालंय. मागील रविवारी आम्ही उभयतांनी तिथे साफसफाई केली. तिथल्या श्रद्धास्थानाला सुस्थापित करण्याचा आमचा मनोदय आहे.

हे सर्व आम्ही कुटुंबीयांनी केलं. बहीण संध्या कामत हिचा हातभार लागला. तसंच माझे स्नेही प्रसाद रेगेही यात सामील झाले होते.

एका सन्मित्राच्या आग्रहाखातर हा लेखन प्रपंच.

धन्यवाद.

  • विनय सौदागर (9403088802)
  • संध्या कामत (9969381138)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply