रत्नागिरीत २२ जानेवारीपासून कालिदास स्मृती व्याख्यानमाला

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे दोन दिवसांच्या कालिदास स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. २२) आणि २३ जानेवारी रोजी ही व्याख्यानमाला होणार असून त्यामध्ये डॉ. सचिन कठाळे व्याख्यान देणार आहेत.

महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सकाळी ११ वाजता व्याख्याने सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी डॉ. कठाळे संस्कृतची सद्यःस्थिती आणि दुसऱ्या दिवशी भारतीय ज्ञान परंपरा यावर व्याख्याने देणार आहेत. व्याख्यानमालेचे हे ६८ वे वर्ष आहे.

डॉ. कठाळे हे एमएस्सी (वनस्पतिशास्त्र), पी. एचडी (अथर्ववेदातील वनस्पतीविज्ञान), एमए (संस्कृत) आहेत. संस्कृत भारतीचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले आहे. कोकण प्रांत संघटनमंत्री, विदर्भ प्रांत संघटनमंत्री, अखिल भारतीय कार्यालय प्रमुख (दिल्ली), अखिल भारतीय प्रचार प्रमुख अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. संस्कृतमधील विज्ञान या प्रदर्शन व पुस्तकाच्या लेखक गटाचे सदस्य आणि कर्माचा सिद्धांत या पुस्तकाचा संस्कृत अनुवाद त्यांनी केला आहे.

त्यांच्या व्याख्यानासाठी जास्तीत जास्त अभ्यासू, रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply