रत्नागिरी : येथील टिळक आळीतील श्री मारुती – गणपती पिंपळपार देवस्थान टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त येत्या २७ ते २९ जून २०२५ या कालावधीत जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
गणपती मंदिराजवळ महिला मंडळ हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, वयस्क गट पुरुष, कुमार गट, कुमारी गट किशोर गट आणि किशोरी गट अशा आठ गटांत खेळवली जाणार आहे.
या वर्षातील ही पहिलीच स्पर्धा आहे . त्यामुळे खेळाडूंनी या वर्षाचे ५० रुपयांचे नोंदणी शुल्क जिल्हा असोसिएशनकडे जमा करावे. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये आणि लहान गटासाठी १०० रुपये असेल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २५ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासह द्यावात.
स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत.
तालुका प्रतिनिधी असे – १) गुहागर –प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे ( ९४२२०५३९४३), चिपळूण – प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५),लांजा – मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६), दापोली – माधव शेट्ये (९२०९७०९७९२).
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून साई प्रकाश कानिटकर, मंदार दळवी व सागर कुलकर्णी काम करणार असून स्पर्धा प्रमुख म्हणून मनोहर केळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, विश्वस्त अरुण करमरकर, मंदार खेर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

