Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

राधाकृष्ण चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २ ऑगस्टपासून

Advertisements

रत्नागिरी : येथील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली श्री राधाकृष्ण चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २ आणि ३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

ही स्पर्धा रत्नागिरीच्या श्री राधाकृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटांत होणार आहे.

या वर्षातील ही तिसरी स्पर्धा आहे . जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेले नाहीत, त्यांनी या वर्षाचे ५० रुपये नोंदणी शुल्क जिल्हा असोसिएशनकडे जमा करावे. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये आणि लहान गटासाठी १०० असेल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका आल्या नाहीत, तर त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ३० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे.

या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी.

तालुका प्रतिनिधी आणि त्यांचे संपर्क क्रमांक असे – गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूण – प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके ( ९१३०३०६५२५), लांजा – मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६), दापोली – माधव शेट्ये (९२०९७०९७९२).

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून विनय गांगण आणि सागर कुलकर्णी यांची व स्पर्धा प्रमुख म्हणून सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष वीरेन्द्र वणजू, सचिव मकरंद खातू, जिल्हा कॅरम अससिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, खजिनदार नितीन लिमये, सचिवक मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version