देवरूख : देवरूख येथील श्री सोळजाई ग्रामदेवी मंदिर संस्थेने येत्या १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोळजाई ग्रामदेवी मंदिरात ही स्पर्धा होईल.
स्पर्धेत ब्रेक टू फिनिश आणि ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून खास रोख पारितोषिके देण्यात येतील.
स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, वयस्क पुरुष गट (५० वर्षांवरील), महिला एकेरी, कुमार गट (१८ वर्षांखालील), कुमारी गट (१८ वर्षांखालील), किशोर गट (१४ वर्षांखालील) आणि किशोरी गट (१४ वर्षांखालील) अशा ८ गटांत होईल. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि अंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार होईल. या क्रीडा वर्षातील ही दुसरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा असल्याने खेळाडूंनी २०२२-२३ या वर्षाची ५० रुपये रजिस्ट्रेशन फी असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये, पुरुष दुहेरी प्रत्येकी ३०० रुपये राहील. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल.
इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका मंगळवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासहित खालील ठिकाणी द्यावयाच्या आहेत. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेत सामना खेळणासाठी पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.
प्रवेशिका सादर करण्यासाठी गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), देवरूख – मोहन हजारे (९४२२०५३९४३), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (२१३०३०६५२५), खेड – योगेश आपटे (०९९५३२२२६३९) यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम राज्यस्तरीय पंच मंदार दळवी आणि सागर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. संतोष दामुष्टे स्पर्धा प्रमुख असतील. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन शरद्चंद्र गांधी (अध्यक्ष, श्री सोळजाई ग्रामदेवी मंदिर), प्रदीप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरस असोसिएशन), सुचय रेडीज (सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), मिलिंद साप्ते (सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरस असोसिएशन) यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
