पेशवाई चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा १७ फेब्रुवारीपासून

रत्नागिरी : श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव दुसरी श्रीमंत पेशवाई चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा १७ आणि १८ फेब्रुवारीला होणार आहे.

स्पर्धा रत्नागिरीच्या मारुती आळीतील श्री हनुमान मित्र मंडळाने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केली आहे. ती रत्नागिरीच्या राधाकृष्ण मंदिरात होईल. स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट अशा सात गटांत होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी १५० रुपये, तर दुहेरी गटासाठी ३०० रुपये असेल. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धकांची नोंदणी झाली नाही, तर त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल.

स्पर्धकांनी प्रवेशिका बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह तालुका प्रतिनिधीकडे द्यावात. स्पर्धेत खेळण्यासाठी पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच मंदार दळवी आणि सागर कुलकर्णी काम करणार असून स्पर्धा प्रमुख म्हणून सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक श्री हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश संसारे, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज आणि सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply