वाटूळच्या आदर्श विद्यामंदिरात माजी विद्यार्थी संघातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

वाटूळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) : येथील आदर्श विद्यामंदिर या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक दिनेश मोरे यांचे करिअर मार्गदर्शनविषयक सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्यालयातील शिक्षक श्री. मयेकर सर यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिनेश मोरे यांनी करिअरच्या निवडीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार करिअरची निवड करण्याचा सल्ला दिला. करिअरच्या निवडीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करण्याच्या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे श्री. त्रिपाठी सर यांनी आभारप्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याधापक श्री. कामत सर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वास चव्हाण, तसेच संस्थेचे माजी पदाधिकारी सुहास चव्हाण, गणपत वळंजू , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, शालेय समितीचे सदस्य नारायण चव्हाण, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण वळंजू, उपाध्यक्ष वर्षा चव्हाण, सचिव राजेश बेर्डे , सोसायटी चेअरमन कृष्णा चव्हाण, माजी उपसरपंच विजय चव्हाण, माजी विद्यार्थी संघाचे कार्यकारिणी सदस्य प्रशांत चव्हाण, संतोष (बंधू ) चव्हाण, विराज चव्हाण, प्रसाद दळवी, ग्रामपंचायत सदस्य ओमकार चव्हाण, माजी विद्यार्थी प्रसन्न खांबे, संतोष चव्हाण, समीर चव्हाण व विद्यार्थी, पालक शिक्षक संघटनेचे सदस्य आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply