रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्सना रात्री १२ पर्यंत व्यवसायाला परवानगी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्सना रात्री १२ वाजेपर्यंत व्यवसाय करायला परवानगी मिळाली आहे. जिल्हा हॉटेल संघटनेने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

फास्ट फूड पदार्थ बनविण्याचे रत्नागिरीत मोफत प्रशिक्षण

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेने फास्ट फूड पदार्थ बनविण्याचे मोफत प्रशिक्षण येत्या १० ते १९ फेब्रुवारी या दहा दिवसांच्या कालावधीत आयोजित केले आहे.

रत्नागिरीत २४ जणांनी घेतले सहल मार्गदर्शनाचे प्रशिक्षण

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानने प्रथमच आयोजित केलेल्या ट्रॅव्हल, टुरिझम गाइड ट्रेनिंग म्हणजेच सहल मार्गदर्शनाचे प्रशिक्षण २४ जणांनी घेतले. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मदतीने शांतीनगर येथील कार्यालयात दहा दिवसांचे हे प्रशिक्षण पार पडले.

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघातर्फे २०२१चे पुरस्कार जाहीर; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा समावेश

रत्नागिरी : अभ्यासू पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, शिक्षक प्रसाद काकिर्डे, उद्योजिका सीमा आठल्ये, कीर्तनकार महेश सरदेसाई, खेळाडू ईशा पवार, उद्योजिका पूर्वा प्रभुदेसाई, वेदमूर्ती नारायण जोगळेकर, डॉक्टर मोहन किरकिरे यांना रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे २०२१ या वर्षाचे पुरस्कार दिले जाणार आहेत.

विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पुरस्कार देऊन गौरव

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवारी (२८ नोव्हेंबर २०२१) राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आले. या वेळी पुण्यातील ‘आपलं घर’ या आश्रमाचे संस्थापक विजय फळणीकर सौ. साधना फळणीकर, अ. भा. कऱ्हाडे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष विजय आंबर्डेकर, सचिव गणेश गुर्जर, अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे व्यासपीठावर उपस्थित होते.

पूर, पाणीटंचाई रोखण्याची इच्छा असलेल्यांसाठी नदीची पाठशाळा

पावसाळ्यातील पूर आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर कोंडगाव-साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) गावांनी यावर्षी मात तर केलीच, पण इतरांनाही तो आदर्श घेता यावा, यासाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नदीची पाठशाळा भरवायचे ठरवले आहे.