रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) येथील धरणफुटीच्या वेळी मदत करणारे रत्नागिरीतील हेल्पिंग हॅण्ड्स करोना महामारीच्या वेळीही कार्यरत झाले आहेत. रत्नागिरी शहर आणि परिसरातील सुमारे दीड हजार कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मोफत वाहतूक करून हेल्पिंग हॅण्ड्सची साखळी आणखी मजबूत होत असतानाच समाजकार्याचा वेगळा मानदंड तयार करत आहे.