आगळीवेगळी पोटापुरती भाजी स्पर्धा

रत्नागिरी : बळीराजा शेतकरी संघ आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे आगळीवेगळी पोटापुरती भाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तिचा प्रारंभ उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे.

आंबा वाहतुकीसाठी कोकण रेल्वेची आणखी एक पार्सल गाडी

रत्नागिरी : ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर कोकण रेल्वेने सोडलेल्या विशेष पार्सल गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता आणखी एक गाडी सोडण्यात येणार आहे. मुंबई आणि गुजरातला हापूस आंबा पाठविण्यासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ एप्रिलपासून आंबाखरेदी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येत्या २३ एप्रिलपासून हापूस आंब्याची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा मिळणार आहे.

वीजपुरवठा खंडित झाला, तर द्या एक मिस्ड कॉल किंवा करा ‘एसएमएस’

रत्नागिरी : घरगुती वीजपुरवठा बंद पडला, तर आता कोणाला फोन करायची किंवा ठरावीक ठिकाणी जाऊन तेथे ठेवलेल्या नोंदवहीत तक्रार नोंदविण्याची गरज नाही. वीजग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाइलद्वारे मिस्ड कॉल आणि एसएमएस अशी सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गातून आंबे अहमदाबादला पाठवण्यासाठी विशेष रेल्वे पार्सल व्हॅन

रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होत आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या माध्यमातून आंबा वाहतूक केली जावी, यासाठी भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश आले असून, आता कोकण रेल्वेच्या पार्सल व्हॅनमधून रत्नागिरीतून अहमदाबादला हापूस आंबा वाहतूक केली जाणार आहे. पहिल्या फेरीमध्ये सुमारे दोन हजार पेट्या आंबा यातून जाणार आहे.

हाडाच्या कलाकारांनी लॉकडाऊनवर मात करतानाच मिळविली पारितोषिके

कुडाळ : ‘करोना’च्या संकटामुळे सर्वांनाच सध्या घरात थांबणे बंधनकारक झाले आहे. तरीही ‘हाडाचा कलाकार’ स्वस्थ बसू शकत नाही. त्यांच्या कलेच्या आविष्काराला व्यासपीठ मिळावे आणि ‘करोना’मुळे सतत घरी राहणे सुसह्य, सुखकारक व्हावे, यासाठी कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स या संस्थेने ‘घरबसल्या जोपासू… वारसा कलेचा… ही एक आगळीवेगळी संकल्पना राबविली. त्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेला महाराष्ट्र आणि गोव्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातील सहा जणांनी रोख पारितोषिकेही पटकावली आहेत.