चार टक्के लोकांना असतो दृष्टी नष्ट करणारा काचबिंदूचा आजार

रत्नागिरी : काचबिंदू आजारामुळे दृष्टीला असणारा गंभीर धोका लक्षात घेऊन रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये येथे सुसज्ज काचबिंदू निदान विभाग सुरू करण्यात आला आहे. याद्वारे येत्या २८ आणि २९ मे रोजी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिली.

करोनाच्या काळात मुलांची अशी घ्या काळजी

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना उपद्रव होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. अशा स्थितीत लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, याविषयी इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यातील प्रश्नोत्तरे सोबत दिली आहेत. विरार (जि. पालघर) येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांचा व्हिडीओ सोबत दिला आहे. तोही पाहावा.

मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात राखणे आवश्यक – डॉ. ठाकूर

रत्नागिरी : सध्याच्या करोनाच्या काळात ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार असतील, त्यांनी ते योग्य नियंत्रणात राहतील याची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिला आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीसह विविध नेत्रविकारांची तपासणी रत्नागिरीत २१ आणि २२ मे रोजी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोना प्रसार केंद्रे

रत्नागिरी शहरात करोनाच्या प्रतिबंधासाठी म्हणून चाललेल्या प्रयत्नांची कार्यालये एका परीने करोनाच्या प्रसाराची केंद्रे ठरली आहेत. रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचण्यांसाठी स्वॅब घेणारी केंद्रे, या चाचण्यांचे अहवाल देणारा जिल्हा रुग्णालयातील कक्ष, रत्नागिरी रेल्वे स्थानक ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत.

‘इन्फिगो आय केअर’मधील कर्मचाऱ्यांना करोनाविषयक प्रशिक्षण – डॉ. श्रीधर ठाकूर

रत्नागिरी : इन्फिगो ग्रुपच्या नेत्र रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना करोनाविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रियाही सुरक्षेची काळजी घेऊन केल्या जातात. त्यामुळे रुग्णांनी करोनाला घाबरू नये, असे आवाहन इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.

कोकणातील पहिली गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी अँड हिपॅटोबिलिअरी सायन्सेस इन्स्टिट्यूट रत्नागिरीत

रत्नागिरी : येथील डॉ. संजय लोटलीकर यांच्या रामनाथ हॉस्पिटलमध्ये कोकणातील पहिल्या ममता गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी अँड हिपॅटोबिलिअरी सायन्सेस इन्स्टिट्यूटचे उद्घाटन आज झाले. रत्नागिरीतील पहिले पदव्युत्तर पदवीधारक डॉक्टर आणि ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रमेश चव्हाण यांनी उद्घाटन केले.