रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे कालपासून ४३ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल (२५ जून) सायंकाळपासून आज सकाळपर्यंत करोनाचे आठ नवे रुग्ण सापडले असून, आज (२६ जून) सायंकाळी ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५५४ झाली असून, त्यापैकी ४०० रुग्ण बरे झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १८८ असून, त्यापैकी १४८ रुग्ण बरे झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ५११

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत वाढीव १२ करोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५११ झाली आहे.

रत्नागिरीतील करोनाबाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (२४ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत आणखी पाच करोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर गेली आहे. आणखी एका रुग्णाच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या २४ झाली आहे. नव्या पाच बाधितांमध्ये पोलीस, आशा वर्कर आणि एक स्टाफ नर्स अशा तिघा करोना योद्ध्यांचा समावेश आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात आज दोघांना घरी सोडण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी करोनाचे दोन बळी; सिंधुदुर्गात १८ रुग्ण वाढले

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ जून) सलग तिसऱ्या दिवशी करोनाचे दोन बळी गेले आहेत. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २३ झाली आहे. आज जिल्ह्यात नवे १० रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ४९४ झाली आहे. बरे झालेले ३६३ रुग्ण लक्षात घेता बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्के झाले आहे. पुन्हा दाखल झालेल्या एका रुग्णासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १०९ जण उपचारांखाली आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून १८ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे तेथील करोनाबाधितांची एकूण संख्या १७८वर गेली आहे.

सिंधुदुर्गात आता फक्त १२ करोनाबाधित; रत्नागिरीत १०६ रुग्णांवर उपचार सुरू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनावर मात केलेल्या आणखी १३ रुग्णांना आज (२२ जून) डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत सिंधुदुर्गात केवळ १२ करोनाबाधित आहेत. रत्नागिरीत सध्या उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या १०६ असून, दोन जणांचा आज मृत्यू झाला.

रत्नागिरीत ३५१ आणि सिंधुदुर्गात १३० जणांची करोनावर मात

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : करोनावर मात केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी १३ रुग्णांना आज (२१ जून) घरी सोडण्यात आले. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३५१, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १३० झाली आहे.