रत्नागिरी जिल्ह्यात १६ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गात १६ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज (१४ जून) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत करोनाचे १६ रुग्ण वाढले असून, १२ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले, तर उपचारांदरम्यान ६७ वर्षांच्या एकाचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात पाच नव्या रुग्णांची भर पडली असून, १६ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात २७९ जण करोनामुक्त; सिंधुदुर्गात आज नवा रुग्ण नाही

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जून) दिवसभरात १९ जणांना करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २७९ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात आज नवा करोनारुग्ण सापडला नसून, १२ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.

रत्नागिरीत करोनाच्या रुग्णांची संख्या २०ने वाढली, १५ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल (ता. ११ जून) सायंकाळपासून आजपर्यंतच्या २४ तासांमध्ये मिळालेल्या करोनाविषयक अहवालांनुसार २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३९२ झाली आहे. करोनामुक्त झाल्याने आज १५ जणांना घरी पाठविण्यात आले. सिंधुदुर्गात दोन नवे रुग्ण सापडले असून, तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्गुरू वामनराव पै यांनी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या त्यांच्या प्रसिद्ध उक्तीतून दिला आहे. करोनाचे जगद्व्यापी संकट आणि कोकणात निसर्ग चक्रीवादळाने दिलेला दणका या पार्श्वभूमीवर या उक्तीचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

‘कोविड-१९’साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीचे पूरक उपचार; राज्याच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : ‘कोविड-१९’च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत नागरिकांकरिता आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांबद्दलच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या विषयावरील कृती दलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यांच्यातर्फे नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय, तसेच करोनाच्या लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. अर्थातच, हे उपचार करोनावरील मुख्य उपचारांना पूरक असल्याचे म्हणजेच डॉक्टरांकडून सुरू असलेल्या औषधोपचारांसोबत घ्यायचे आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी तीन करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांच्यासह रुग्णांची एकूण संख्या ३६७ झाली आहे. बरे झालेल्या ११ करोनाबाधित रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत घरी पाठविलेल्या रुग्णांची संख्या १९५ झाली आहे. विविध रुग्णालयांमध्ये १५८ रुग्ण उपचारांखाली असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आजारी रुग्णांपेक्षा अधिक आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १३० झाली आहे. तसेच, सिंधुदुर्गातही आता करोनाच्या चाचण्या होणार आहेत.