रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत वाढीव १२ करोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५११ झाली आहे.
जिल्ह्यात काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालांनुसार १२ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांचे विवरण असे – इसवली, ता. लांजा – २, खावदरवाडी, ता. लांजा – १, खेडशी नाका, रत्नागिरी – १, उद्यमनगर, रत्नागिरी – १, कदमवाडी, रत्नागिरी – १, आडे, दापोली – २, विसापूर, दापोली – १, अनदेरी, संगमेश्वर – १ आणि संगमेश्वर – २.
कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथून ९, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथून ३, तर संगमेश्वरमधून एक अशा १३ रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३७७ झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७३ टक्के आहे.
सध्या रुग्णालयात असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १११ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या २४ आहे.
आज शिवाजीनगर, मजगाव रोड हे करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यासह जिल्ह्यात सध्या ४९ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी १९, गुहागर १, संगमेश्वर १, दापोली ६, खेड ८, लांजा ६, चिपळूण ६, राजापूर २.
मुंबईसह एम. एम. आर. क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर अशा होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या २६ हजार १३९ आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण आठ हजार ६६० नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी आठ हजार ४८९ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ५११ पॉझिटिव्ह, तर सात हजार ९५४ निगेटिव्ह आहेत. आणखी १७१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामध्ये १८ अहवाल मिरज आणि १५३ अहवाल रत्नागिरीतील प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत.
…….
