कोकणातील कलाकारांची संगीतसाधना एकलव्यासारखी : डॉ. गजानन रानडे

रत्नागिरी : शंभर वर्षांपेक्षा संगीत नाटकांची परंपरा जपणाऱ्या कोकणातील कलाकारांची साधना एकलव्यासारखी आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गजानन रानडे यांनी राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात काढले.

कट्यार काळजात घुसली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १० मार्च २०२२ रोजी कट्यार काळजात घुसली हे नाटक रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ सादर करणार आहे.

संगीत नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका शनिवारपासून उपलब्ध

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा येत्या १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका शनिवार, ५ मार्चपासून उपलब्ध होणार आहेत.

साठावी संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्चपासून रत्नागिरीत

रत्नागिरी : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे साठावी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा येत्या १० मार्चपासून रत्नागिरीत होणार आहे. या स्पर्धेला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.