कट्यार काळजात घुसली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१० मार्च २०२२) – कट्यार काळजात घुसली
सादरकर्ती संस्था – अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज १० मार्च २०२२ रोजी कट्यार काळजात घुसली हे नाटक रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ सादर केले.

पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेले ‘कट्यार काळजात घुसली’ हे २४ डिसेंबर १९६७ रोजी रंगभूमीवर आलेले नाटक सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक लोकप्रियता लाभलेले नाटक आहे. त्यातील नाट्यपदांना पं. जितेंद्र अभिषेकीबुवांनी दिलेल्या एकाहून एक उत्तम चाली लाजवाब ठरल्या. संगीताच्या दोन घराण्यांमधील संघर्ष ही या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. पंडित भानुशंकर यांची सत्त्वशील, आध्यात्मिक परिमाण लाभलेली ज्ञानयोग्याची गायकी आणि स्वररंजनाच्या विलासी मस्तीत रंगलेली तरीही बारीक बारीक लयकारीच्या सुखद क्षणांची पखरण केलेली खाँसाहेब आफताब हुसेन यांची गायकी अशा दोन गायकींच्या मध्ये सापडलेला ज्ञानासक्त सदाशिव. पराभवानंतर परागंदा झालेल्या पं. भानुशंकर यांचा शिष्य सदाशिव गाणे शिकवण्यास नकार देणाऱ्या खाँसाहेबांचे गाणे चोरून चोरून ऐकतो आणि आत्मसात करत जातो. हे त्याचे बिंग उघडकीस आल्यावर खाँसाहेबांचा राग अनावर होतो आणि राजगायक म्हणून मिळालेल्या कट्यारीच्या विशेष अधिकाराचा उपयोग करून सदाशिवला मारण्याचा पवित्रा घेतात. या प्रवृत्ती संघर्षाच्या चरमसीमेवर हे नाटक पोहोचते.

मुंबईत गिरगाव येथील साहित्य संघाच्या नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला. त्यानंतर अनेक नाट्यसंस्थांनी या नाटकाचे प्रयोग केले.

रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने या तीन अंकी नाटकाचे आव्हान पेलले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या साठाव्या संगीत नाट्य स्पर्धेत १० मार्च २०२२ रोजी पहिले नाटक सादर करण्याची संधी या संस्थेला मिळाली आहे.

संगीत हाच आत्मा असलेल्या या नाटकाचे मूळ संगीत दिग्दर्शन पं. जितेंद्र अभिषेकी यांचे असून चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या नाटकात राम तांबे आणि संध्या सुर्वे यांनी संगीत मार्गदर्शन केले आहे. वामन जोग यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.

नाटकाच्या अन्य सर्व बाजू सांभाळणारे कलाकार असे –
ऑर्गन – वैभव फणसळकर, तबला साथ – निखिल रानडे, नेपथ्य – प्रसाद लोगडे, नेपथ्य साह्य – किशोर नेवरेकर, सुधाकर घाणेकर, अमित धांगडे, संजय लोगडे, सौरभ लोगडे, रंगमंच व्यवस्था – गणेश जोशी, अनिकेत आपटे, पूर्वी जोगळेकर, चेतन जोशी, रंगभूषा – प्रसाद लोगडे, रंगभूषा साह्य – रामदास मोरे, शमिका जोशी, वेशभूषा – प्राजक्ता जोशी, अर्चना जोशी, प्रकाशयोजना – मंगेश लाकडे, पार्श्वसंगीत – रामदास मोरे, सूत्रधार – श्रीनिवास जोशी, राजेंद्र पटवर्धन, विशेष साह्य – मनोहर जोशी, प्रदीप तेंडुलकर, खल्वायन संस्था, रत्नागिरी.

कट्यार काळजात घुसली नाटकातील एक प्रसंग

भूमिका आणि कलावंत :
उमा – सायली मुळ्ये
बद्रीप्रसाद – वामन जोग
पठाण (सेवक), दरबारी सेवक — अविनाश काळे
दिवाणजी – अनिकेत आपटे
बाँकेबिहारी – संतोष दामले
चाँद – कौस्तुभ सरदेसाई
उस्मान -साईश प्रभुदेसाई
झरीना – मनाली जोशी
मुलगा (छोटा सदाशिव) – सूर्याक्ष रेमणे
पंडित भानुशंकर – राम तांबे
सदाशिव – श्रीधर पाटणकर
उस्ताद (खाँसाहेब ) – स्वानंद भुसारी

या नाटकाचा काही अंश आणि गीते पाहा पुढील व्हिडिओ लिंकवर…

स्पर्धेचे वेळापत्रक

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply