सावंतवाडी, वेंगुर्ल्यात प्रत्येकी एक नवा करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात आज प्रत्येकी एक नवा करोनाबाधित रुग्ण आढळला. इतर तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही.

जिल्ह्यात ४९ रुग्ण सक्रिय असल्याने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी त्याबाबतचा अहवाल दिला आहे.

अहवालानुसार आज (दि. १० मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ११४ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी दोघे वगळता इतर सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ४९ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर, किंवा चिंताजनक अवस्थेत नाही.

आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ३७५ रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ७९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ५२७ एवढीच आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग २, कणकवली ४, कुडाळ ८, मालवण १९, सावंतवाडी ६, वैभववाडी १, वेंगुर्ले ८, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८५, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१९, कुडाळ – २५४, मालवण – २९९, सावंतवाडी – २१६, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply