रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १० मार्च) करोनाचे २ नवे रुग्ण आढळले. आज सात रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या जिल्ह्यात केवळ ७ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४५६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९१५ म्हणजे ९६.९९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १५२ नमुन्यांपैकी १५० निगेटिव्ह, तर २ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व ३०६ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २९ हजार ९९४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ३, तर लक्षणे असलेले ४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ३, तर संस्थात्मक विलगीकरणात ४ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली नाही.
अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. डीसीएचमध्ये ४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तसेच अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण नाही.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).
जिल्ह्यातील लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात ९ मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ६४ सत्रं पार पडली. त्यात १७५ नागरिकांनी लशीचा पहिला, तर २०५६ जणांनी दुसरा डोस घेतला. १९४ जणांनी तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेतला. एकूण २४२५ जणांचे लसीकरण ९ मार्च रोजी झाले. ९ मार्चपर्यंतच्या १८ वर्षांवरील व्यक्तींच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ९५२ जणांचा पहिला, तर ८ लाख ६८ हजार ३१६ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख २१ हजार ३३ जणांचे लसीकरण झाले आहे.
Follow Kokan Media on Social Media

