मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ कार्यक्रमात शहापूरच्या महिलेचा संवाद

ठाणे : गटशेती करीत असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली. त्यामुळे गेल्या वर्षी भेंडी, मिरची गवार भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले. याशिवाय ट्रक्टर आणि शेततळ्याचा लाभ झाल्याचे शहापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी जानकी तुकाराम बगळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘विकेल ते पिकेल’ या कृषी विभागाच्या ऑनलाइन कार्यक्रमात संवाद साधून स्पष्ट केले.

‘विकेल ते पिकेल’ या धोरणावर मुख्यमंत्र्यांचा आज १२.३० वाजता शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कृषिविषयक योजनांच्या संदर्भात गुरुवार, १० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत शेतकऱ्यांशी ऑानलाइन संवाद साधणार आहेत.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींकडून मुख्यमंत्री निधीला साडेचौदा लाख

रत्नागिरी : करोनाच्या साथीमुळे सार्वजनिक कार्यक्रम होत नसले, तरी त्यासाठी केलेल्या तयारीला आणि उत्साहाला विधायक पर्याय शोधण्याचे प्रयत्न अधूनमधून होताना दिसतात. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही भपकेबाज कार्यक्रम न करता चौदा लाख एकतीस हजार रुपयांची रक्कम जमवून कोविड-१९चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री निधीला देऊन असेच उदाहरण घालून दिले आहे.

रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्याबद्दल आभार

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रत्नागिरी रिफायनरीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे मुखमंत्र्यांना धन्यवाद देण्यात आले आहेत. कोकणाच्या जनतेला बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर काढून समृद्धीची पहाट दाखवण्यासाठी रिफायनरी प्रकल्पाची लवकरात लवकर अधिसूचना जारी करावी, असे आवाहन जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि प्रवक्ते अविनाश महाजन यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केले आहे.

महाजॉब्ज पोर्टलचे लोकार्पण; नोकरी शोधणारे कामगार आणि मनुष्यबळ शोधणारे उद्योजक यांच्यातील दुवा

मुंबई : राज्यातील नागरिकांना रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी साह्यभूत ठरेल, अशा महाजॉब्ज पोर्टलचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (सहा जुलै) मुंबईत झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक आणि अदिती तटकरे आदी या वेळी उपस्थित होते.

कोकणातील नुकसानाविषयी शरद पवार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई : दोन दिवस कोकणाचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (११ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोकणातील निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची माहिती पवार यांनी त्यांना दिली. फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड त्यांना सांगण्यात आली.