रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या एकसष्टाव्या मृत्यूची नोंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ ऑगस्ट) करोनाबाधित एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातीलरुग्णांची संख्या आता ६१ झाली आहे. काल (१ ऑगस्ट) रात्री उशिरा सापडलेल्या ५५ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांनंतर आज दिवसभरात आतापर्यंत नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८८१ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८८ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनामुक्तीचे प्रमाण ६८.५ टक्के; दिवसभरात १०७ रुग्णांची भर

रत्नागिरी : आज (एक ऑगस्ट) जिल्ह्यातील ५९ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या १२५२ असून, जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६८.५ टक्के आहे. दरम्यान, आज (एक ऑगस्ट) रात्री नऊ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १०७ नवे करोनाबाधित आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८८१ झाली आहे.

रत्नागिरीत करोनाबाधितांची संख्या १८२६वर; पण करोनामुक्तीच्या प्रमाणात वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज (३१ जुलै) घरी सोडलेल्या २४ जणांसह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११९३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल (३० जुलै) सायंकाळपासून आज रात्री सव्वानऊ वाजेपर्यंतच्या जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार ७६ नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८२६ झाली आहे. सिंधुदुर्गात आज आठ नव्या रुग्णांची वाढ झाली.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींकडून मुख्यमंत्री निधीला साडेचौदा लाख

रत्नागिरी : करोनाच्या साथीमुळे सार्वजनिक कार्यक्रम होत नसले, तरी त्यासाठी केलेल्या तयारीला आणि उत्साहाला विधायक पर्याय शोधण्याचे प्रयत्न अधूनमधून होताना दिसतात. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही भपकेबाज कार्यक्रम न करता चौदा लाख एकतीस हजार रुपयांची रक्कम जमवून कोविड-१९चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री निधीला देऊन असेच उदाहरण घालून दिले आहे.

रत्नागिरीत २९ नवे रुग्ण; एकूण संख्या १७७५

रत्नागिरी : आज रात्री (३० जुलै) हाती आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी २९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या आता १७७५ झाली आहे. सिंधुदुर्गात आणखी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३६४ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत ३७ नवे करोनाबाधित, तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (२७ जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाच्या नव्या ३७ रुग्णांची भर पडली. तिघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर बरे वाटलेल्या ३४ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. सिंधुदुर्गात १५ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ३२८ झाली आहे.