रत्नागिरी : आज रात्री (३० जुलै) हाती आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी २९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या आता १७७५ झाली आहे. सिंधुदुर्गात आणखी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३६४ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आत्ता सापडलेल्या २९ नव्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील १४, कामथ्यातील १४ जणांचा समावेश आहे. तसेच अँटिजेन चाचणीतील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ रुग्णांना आज बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ११६९ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हिड केअर सेंटर समाजकल्याण भवन येथील चार, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे येथील २९ आणि कोव्हिड केअर सेंटर माटे हॉल येथील तीन जणांचा समावेश आहे. हर्णै (दापोली) येथील एका ६४ वर्षीय करोना रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ५९ झाली आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
